News Flash

शासकीय दिनदर्शिकेतून मराठी महिने गायब!

परंतु २०२१ च्या दिनदर्शिकेत मराठी महिन्यांचा उल्लेखच गाळला गेला आहे.

आमदार अतुल भातखळकर यांची टीका

मुंबई : आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने २०२१ च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सेनेला आता मराठी महिन्यांचासुद्धा तिरस्कार वाटत असल्याची टीका मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, प्रत्येक वर्षी या दिनदर्शिकेत इंग्रजी महिन्यांसोबतच मराठी महिन्यांचासुद्धा उल्लेख केला जातो. परंतु २०२१ च्या दिनदर्शिकेत मराठी महिन्यांचा उल्लेखच गाळला गेला आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई मंत्री असलेल्या उद्योग विभागाच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली असली तरीही यात पर्यटन विभागाची प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिने काढून टाकण्यामागे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आहेत काय? असा प्रश्नसुद्धा आमदार भातखळकर यांनी विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 3:08 am

Web Title: marathi months disappear from government calendar akp 94
Next Stories
1 मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे
2 ‘पुस्तकांचं गाव योजनेचा राज्यभर विस्तार’
3 अश्लील चित्रफितींच्या प्रसारणातून कोट्यवधींची कमाई
Just Now!
X