* ‘केसरी’तील फूट व ‘सचिन’च्या दुरवस्थेमुळे संभ्रम
* वीणा पाटील यांची २ जुलैपासून नवी संस्था
मराठी पर्यटन विश्वाचे क्षितिज रुंदावणाऱ्या दोन महत्त्वाच्या संस्थांमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घडामोडींमुळे पर्यटन विश्वाला मोठा हादरा बसला. आर्थिक डबघाईला आलेल्या ‘सचिन ट्रॅव्हल्स’बाबतच्या बातम्यांनी या कंपनीची विश्वासार्हता धुळीला मिळवली, तर ‘केसरी ट्रॅव्हल्स’मध्ये पडलेल्या फुटीमुळे मराठी पर्यटकांना काहीसा धक्काच बसला. ‘केसरी’तून बाहेर पडलेल्या वीणा पाटील यांनी स्वत:ची संस्था काढण्याचा निर्णय घेतला. ही संस्था २ जुलैपासून पर्यटकांच्या सेवेत कार्यरत होणार आहे.
‘कॉक्स अँड किंग्ज’, ‘थॉमस कूक’, ‘क्योनी’ अशा परदेशी कंपन्यांना टक्कर देत ३० वर्षांपूर्वी केसरी पाटील यांनी ‘केसरी टूर्स’ सुरू केली. ‘केसरी’ने मराठी पर्यटन विश्वाचे क्षितिज युरोप, अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया असे पंचखंडात विस्तारले. त्यांच्यासोबत इतरही मराठी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले. मात्र यापैकी ‘सचिन ट्रॅव्हल्स’ या बडय़ा कंपनीची आर्थिक दुर्दशा गेल्या काही महिन्यांपूर्वी समोर आली. या कंपनीने अनेक पर्यटकांचे पैसे थकवल्याची, गैरसोय केल्याची चर्चा वर्तमानपत्रांमध्येही झाली आणि ‘सचिन’च्या विश्वासार्हतेला तडा गेला.
दरम्यान, ‘केसरी’सारख्या बडय़ा कंपनीतही ‘भाऊबंदकी’ सुरू झाली आणि ‘केसरी’च्या व्यवस्थापकीय संचालक वीणा पाटील कंपनीतून बाहेर पडल्या. मात्र वीणा पाटील यांच्या मते ही घटना मराठी पर्यटन विश्वासाठी फायद्याची ठरेल. आमची स्पर्धा एकमेकांशी नसून आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीची सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ‘केसरी’ मोठे नाव आहेच, पण आम्हीही पुढील दोन वर्षांत आमचे नाव प्रस्थापित करू. परिणामी मराठी पर्यटकांच्या दिमतीला एक सोडून दोन दोन विश्वसनीय कंपन्या असतील, असे वीणा पाटील म्हणाल्या.

छोटय़ा ऑपरेटर्सची चलती
बडय़ा संस्थांच्या विश्वासार्हतेला गेलेल्या तडय़ामुळे छोटे टूर ऑपरेटर्स मात्र फायद्यात आहेत. पर्यटन विषयात नुकतीच पदवी घेतलेले विद्यार्थी ओळखीतल्या लोकांना कमीत कमी दरात चांगली ‘पॅकेजेस’ आखून देतात. हा ओळखीचा मामला असल्याने ग्राहकालाही हे ‘पॅकेज’ स्वस्तात मिळते. त्याचप्रमाणे या नव्या व्यावसायिकांना अनुभव मिळतो. सध्या या प्रकाराला खूप पसंती मिळत आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

‘मिक्ता’ची जबाबदारी
वीणा पाटील यांची नवी संस्था सुरू होण्याआधीच तब्बल ३०० सेलिब्रिटी पर्यटकांना थेट युरोपात घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दरवर्षी परदेशात होणाऱ्या ‘मिक्ता’ पुरस्कार सोहळ्याच्या ‘प्रवास’ विभागाची जबाबदारी ‘केसरी’ने समर्थपणे बजावली होती. मात्र ‘केसरी’तून विलग झालेल्या वीणा पाटील यांच्यावर विश्वास दाखवत ‘मिक्ता’ने यंदा ही जोखीम त्यांच्या नव्या संस्थेवर टाकली आहे.