वैद्यकीय परीक्षेतील मूल्यांकनाच्या पद्धतीत बदल केल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील वैद्यकीय सेवेला फटका बसणार आहे.
वैद्यकीय परीक्षेतील मूल्यांकनाच्या पद्धतीत यंदा बदल झाल्याने दोन परीक्षकांकडून तपासणी होऊन त्यांनी दिलेल्या गुणांची सरासरी काढण्यात आली. त्याचा फटका ११ हजार जणांना बसला. त्याविरोधात ‘मार्ड’ने या बदललेल्या मूल्यांकन पद्धतीला विरोध करण्यासाठी गुरुवारी ‘मास बंक’ (लाक्षणिक संप) पुकारला आहे.
आरोग्य विज्ञान विज्ञापीठाच्या विद्वत सभेची बैठक २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यात मूल्यांकन पद्धतीमधील बदलाबाबत पुढील निर्णय होण्याची अपेक्षा आहे.