दिशा खातू

विविध प्रकारचे ख्रिसमस ट्री, दिव्यांच्या माळा उपलब्ध

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Gold prices hit highs in gold market in Delhi
सोन्याच्या भावाची उच्चांकी गुढी; दिल्लीत भाव ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

मुंबईतील सर्व बाजार सध्या नाताळ सजावटीच्या साहित्याने सजले आहेत. ख्रिसमस ट्री, ख्रिस्तजन्माच्या देखाव्याचे गोठे, मुखवटे, सांताक्लॉजच्या टोप्या इत्यादी साहित्याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.

ख्रिसमस ट्री हिरव्या पानांचेच असते, ही संकल्पना मागे पडली आहे. स्प्रिंग स्टॅण्ड, लाकडी स्टॅण्डवर लावलेली पिसांची झाडे बाजारात आली आहेत. ती सजवण्यासाठी रंगीत काठय़ा, चेंडू, कागदी माळा, दिव्यांच्या माळा इत्यादी गोष्टींनाही तेवढीच मागणी आहे. अशा वेगळ्या रचनांच्या झाडांना मागणी असल्याचे जुहू येथील सोनू पटेल या दुकानदाराने सांगितले.

लहान, मोठय़ा बल्बना मोठी मागणी आहे. त्यांची किंमत १०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती वांद्रे येथील हमीद शेख या विक्रेत्याने दिली. तसेच रांगोळी भरलेल्या, रंगवलेल्या काचेच्या बरण्या, दिव्यांच्या माळा सोडलेल्या विविध आकाराच्या बरण्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विद्युत दिव्यांच्या माळांचे घर, सांताचे चित्र असलेले छोटे कंदील, घंटा, तारा असे विविध रचना, उपलब्ध असल्याची माहिती अंधेरीतील मधु देवळेकर या दुकानदाराने दिली. यांच्या किमती १५० ते ६५० रुपयांपर्यंत आहेत.

पूर्वी पांढरे सिमेंट, चिकण माती, पातळ पुठ्ठय़ाच्या कटआऊटमधील गोठे मिळत. आता मात्र गोठय़ाच्या आकारातील पुठ्ठे, लाकडी तयार गोठेही बाजारात आले आहेत. अशा गोठय़ांना पसंती मिळत आहे. यात आपल्याला हव्या त्या पद्धतीने सजावट करता येते. याच्या किमती ३०० ते ८०० रुपयांदरम्यान आहेत, असे रिओ डिमेलो या दुकानदाराने सांगितले.