06 July 2020

News Flash

लग्न ही काही आयुष्यभरासाठीची गोष्ट नाही- सलमान खान

लग्न ही काही आयुष्यभरासाठीची गोष्ट नाही, असे उद्गार बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने काढले

सलमान खानवर लावण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध झाले असून, त्याला कोणतीही दया दाखवण्यात येऊ नये, असेही संदीप शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले.

लग्न ही काही आयुष्यभरासाठीची गोष्ट नाही, असे उद्गार बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने काढले आहेत. ‘बिग बॉस-९’ या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तो बोलत होता. यावेळी पत्रकारांकडून सलमानला लग्नाविषयी छेडण्यात आले. तुझ्याबाबतीत एकाचे दोन (डबल) कधी होणार, असा सवाल यावेळी सलमानला विचारण्यात आला. या प्रश्नाला मिष्कीलपणे उत्तर देताना सलमान म्हणाला की, मी तर ‘मैने प्यार किया’नंतरच ‘डबल’ झालो होतो (शरीरयष्टीने) आणि आणि आता ‘सुलतान’च्या वेळेपर्यंत ट्रिपल झालोयं. याशिवाय, आजच्या जमान्यात लग्न ही आयुष्यभर टिकणारी गोष्ट राहिलेली नाही. हल्ली असले काही घडतच नसल्याचे सलमानने सांगितले. मी तात्पुरते लग्न करावे की कायमचे, याबाबतीत मी काय करावे असे तुला वाटते, असा सवालही सलमानने यावेळी एका पत्रकाराला विचारला. मात्र, जेव्हा या पत्रकाराने सलमानला लग्न न करण्याचा सल्ला दिला तेव्हा सलमान म्हणाला की, काहीजण मला सांगतात लग्न कर आणि काहीजण सांगतात लग्न करू नकोस. त्यामुळे तुम्ही सगळे मला लग्नासाठी तयार करताय की मला लग्नापासून परावृत्त करताय, हाच प्रश्न मला पडत असल्याचे सलमानने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2015 2:49 pm

Web Title: marriage is not for lifetime salman khan
Next Stories
1 ७/११ बॉम्बस्फोट खटल्यात पाच दोषींना फाशी, ७ जणांना जन्मठेप
2 ‘आयएनएस कोची’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल
3 समान काम, असमान दाम
Just Now!
X