News Flash

विवाहित मुलगीही अनुकंपा नोकरीसाठी पात्र!

महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात मुलगा-मुलगी हा भेदभाव सरकार कसा करते, असा सवाल करीत विवाहित मुलगीही अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीची लाभार्थी असू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई

| December 7, 2013 02:23 am

मुंबई उच्च न्यायालयाचा  निकाल
महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात मुलगा-मुलगी हा भेदभाव सरकार कसा करते, असा सवाल करीत विवाहित मुलगीही अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीची लाभार्थी असू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.
पुणे येथील स्वरा कुलकर्णी हिच्या याचिकेवर न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. अनुकंपा तत्वावर केवळ अविवाहित मुलींनाच नोकरी देण्यासंदर्भातील १९९४ च्या शासननिर्णयाला स्वराने आव्हान दिले होते.
जलसिंचन विभागात वायरमन असलेल्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर आई आणि लहान बहिणीची जबाबदारी घेतलेल्या स्वराने मोठय़ा मुलीच्या नात्याने अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज स्वीकाण्यातही आला. तिचे नाव प्रतीक्षा यादीत होते. ही प्रक्रिया सुरू असतानाच तिचे लग्न झाले. ही बाब कळल्यावर आधी २००९ व नंतर २०१२ मध्ये तिचा अर्ज १९९४च्या निर्णयाचा हवाला देत फेटाळण्यात आला.
त्याविरोधात स्वराने शासननिर्णयाच्या घटनात्मक वैधतेला अ‍ॅड्. आशुतोष कुलकर्णी यांच्यामार्फत आव्हान दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:23 am

Web Title: married daughters can get govt job on compassionate grounds
Next Stories
1 टिळा भडक, जय भीम कडक!
2 शाळा प्रवेशाचा सावळा गोंधळ
3 आठवलेंना उपमुख्यमंत्री पद देऊ- तावडे
Just Now!
X