19 September 2020

News Flash

‘संविधान बचाओ’, ‘भारत बचाओ’च्या घोषणा देत मुंबईत CAA विरोधी मोर्चा

या मोर्चात विविध प्रकारच्या ६५ संघटना सहभागी झाल्या आहेत

CAA, NRC विरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात एकूण ६५ संघटना सहभागी झाल्या आहेत. संविधान बचाओ, भारत बचाओ अशा घोषणा देत मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला आहे. फक्त मुसलमानच नाही तर इतर धर्माच्या संघटनाही या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. CAA, NRC आणि NPR ला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन करण्यात येते आहे. या आंदोलनत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.

साधारण महिना ते दीड महिन्यापासून देशभरात CAA, NRC विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही CAA, NRC ला समर्थन देण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा आयोजित केला होता. आता आज मुंबईतील आझाद मैदानात CAA विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये फक्त मुसलमान संघटनांचाच नाही तर इतर संघटनांचाही सहभाग आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 3:19 pm

Web Title: massive protest at mumbais azad maidan against caa nrc npr scj 81
Next Stories
1 आमच्या अंतर्गत विषयांपासून लांब राहा, भारताने टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना बजावलं
2 ‘CAA विरोधी आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही’
3 दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल घेणार शपथ, रामलीला मैदानावर उद्या सोहळा
Just Now!
X