मुंबई : अध्यापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे वाढता कल लक्षात घेता अशा तंत्रज्ञाननिर्मिती करण्याच्या संकल्पनेवर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) येथे ‘एज्युकेशनल टेक्नॉलॉजी’ हा आंतरविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.टेक) सुरू करण्यात येत आहे.

तंत्रज्ञान आधारित शिक्षण पद्धतीवर नवे नवे संशोधन होत आहे. अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी तंत्रज्ञान, विविध प्रणालींचा विकास होण्याची आवश्यकता आहे.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

त्या दृष्टीने आयआयटी मुंबई येथे ‘एज्युकेशन टेक्नॉलॉजी’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१९) सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळण्यासाठी नव्या प्रणाली, तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या सक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे हा या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. तंत्रज्ञान विकासाबरोबरच शैक्षणिक सिद्धांत, अध्यापनशास्त्र, विश्लेषण, रचना, संशोधन प्रणाली, संशोधनाचे शिक्षण पद्धतीत उपयोजन करणे, शैक्षणिक वातावरण अशा घटकांचा समावेश असणार आहे.

दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांत सैद्धांतिक घटकांबरोबरच आठ आठवडय़ांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव, प्रकल्प अशी रचना असणार आहे.

सक्षम मनुष्यबळाची निर्मिती हा अभ्यासक्रमाचा उद्देश

विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळण्यासाठी नव्या प्रणाली, तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या सक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे हा या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१९) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.