माथाडी कामगारांचे नेते आणि अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस बाबुराव रामिष्टे यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, एक कन्या असा परिवार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रामिष्टे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटना स्थापण्यात रामिष्टे यांचा सहभाग होता. ‘माथाडी कामगारांचा लढाऊ नेता’ अशी रामिष्टे यांची ओळख होती. वेठबिगाराप्रमाणे राबणाऱ्या माथाडी कामगारांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. माथाडी कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावित यासाठी त्यांनी सादर केलेली योजना राज्य शासनानेही स्वीकारली. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.
शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रामिष्टे यांचे पार्थिव कर्नाक बंदर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Kapil Patil met Raj Thackeray,
भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्याकडून मनसेचे राज ठाकरे यांची भेट
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत