पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे प्रवाशांना दिलासा; करीरोड, चिंचपोकळी स्थानकांचाही विकास होणार

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला यांदरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पातील परळ टर्मिनसचे काम सुरू झाले असून या प्रकल्पामुळे परळबरोबरच उर्वरित स्थानकांचाही कायापालट होणार आहे. त्यात शीव, माटुंगा, चिंचपोकळी आणि करीरोड या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांपैकी शीव आणि माटुंगा या दोन स्थानकांमध्ये दोन-दोन फलाटांची भर पडणार आहे. तसेच या चारही स्थानकांमध्ये सध्या असलेल्या फलाटावर प्रवासी सुविधांसाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी रेल्वेला किती जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे, याची पाहणी सध्या चालू आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार असून त्यानुसार कुर्ला स्थानकात हार्बर मार्गासाठी उन्नत फलाट बनवले जाणार आहेत. त्यानंतर सध्या अस्तित्त्वात असलेल्या हार्बर मार्गिकेचा वापर शीव-कुर्ला या दोन स्थानकांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका म्हणून केला जाईल. शीव स्थानकाजवळ या दोन्ही मार्गिका पश्चिम दिशेला सरकणार आहेत. परळपर्यंत या मार्गिका पश्चिमेकडूनच येणार असून परळ ते चिंचपोकळी यांदरम्यान त्या पूर्व दिशेकडे जातील.

शीव स्थानक

शीव रुग्णालय, वांद्रे-कुर्ला संकुल आदी गोष्टी जवळ असल्याने उपनगरीय रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक! सध्या असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक १च्या बाजूला आणखी एक फलाट होईल.

त्या प्लॅटफॉर्मच्या बाजूने दोन मार्गिका जाणार असून पश्चिमेकडील शेवटच्या मार्गिकेच्या बाजूला नवीन फलाट क्रमांक एक तयार होणार आहे. त्यामुळे सध्याचा फलार्ट क्रमांक एक हा भविष्यात फलाट क्रमांक तीन म्हणून ओळखला जाईल. या नव्या फलाटासाठी पादचारी पूल, सरकते जिने आदी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शीव स्थानकातील एकूण फलाटांची संख्या चारवरून सहा एवढी होणार आहे.

माटुंगा स्थानक

मुंबईतील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था माटुंगा स्थानक परिसरात आहेत. या स्थानकाच्या पश्चिम बाजूची जागा मोकळी असल्याने या दोन मार्गिका त्याच भागातून येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गिकेच्या बाजूला नवीन मार्गिका येणार आहे. या मार्गिकेच्या पश्चिम दिशेकडे दोन फलाट उभे राहणार असून त्यांच्या पलीकडून एक मार्गिका जाईल. ती मार्गिका कल्याणकडे जाणारी धीमी मार्गिका म्हणून काम करेल. माटुंगा स्थानकात सहा फलाट होतील.

करीरोड व चिंचपोकळी

या दोन्ही स्थानकांवर प्रत्येकी एक नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय सरकत्या