26 January 2021

News Flash

तापमानवाढ कायम

सांताक्रूझ केंद्रावर ३५.३ अंश, तर कुलाबा केंद्रावर ३२.२ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले.

मुंबई : शहर आणि उपनगरात कमाल तापमानात मंगळवारी पुन्हा एक अंशाची वाढ झाली. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागला.

शनिवारपासून कमाल तापमानात वाढ होत आहे.  सांताक्रूझ केंद्रावर ३५.३ अंश, तर कुलाबा केंद्रावर ३२.२ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. गेल्या दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाच्या नोंदी या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातील आहेत. तुलनेने महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात तापमान वाढीच्या नोंदी कमी आहेत. मुंबईच्या कमाल तापमानातील नोंदी तीन ते चार अंशाने अधिक असून, किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंशाने अधिक आहे.

गेल्या आठवडय़ातील अतिवाईट हवेच्या तुलनेत या आठवडय़ात प्रदूषण कमी झाले आहे. सोमवारी हवेची गुणवत्ता मोजण्याच्या आठपैकी दोन केंद्रांवर गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट, तीन ठिकाणी वाईट आणि उर्वरीत ठिकाणी मध्यम स्तरावर राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 2:41 am

Web Title: maximum temperature in mumbai city and suburbs rise again zws 70
Next Stories
1 चित्रपट स्वामीत्वहक्कप्रकरणी  ‘बॉक्स सिनेमा’वर कारवाई
2 ‘पीओपी’ वापरावरील बंदीस स्थगिती
3 लसीकरण तोंडावर; शीतगृह अपूर्णावस्थेत
Just Now!
X