वातानुकूलित लोकल पुढील वर्षी जानेवारीत पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चर्चगेट ते बोरिवली दरम्यानच्या जलद मार्गावर ही रेल्वे चालविण्याचा विचार असून, ती १२ डब्यांची करण्याची योजना आहे. यासाठी ७५ आणि १०० रुपयांचे तिकीट आकारण्याचा विचार आहे. तसेच प्रवासासाठीचे ४० ते २५ किलोमीटरचे टप्पे ठरविण्यात येणार आहेत. ही वातानुकूलित लोकल खरेतर याच वर्षी रेल्वेच्या सेवेत आणण्याची योजना होती. परंतु आता या रेल्वेला जानेवारी २०१६चा मुहूर्त ठरवून देण्यात आला आहे; तसेच आधीच्या तीन डब्यांत विभागण्याऐवजी नेहमीप्रमाणे १२ डब्यांची करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.