धवल कुलकर्णी

होम quarantine म्हणजेच करोनाचा धोका असलेल्या मंडळींनी घराच्या बाहेर न पडणे आणि त्याला अनुषंगून घालण्यात आलेल्या निर्बंधांना धुडकावून लोक बाहेर फिरत असलेल्या तक्रारी आल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका अशा लोकांच्या घराबाहेर होम कारण त्यांचे स्टिकर लावू शकते. यामुळे घरातील व्यक्ती या quarantine मध्ये असल्याबाबत आसपासच्या लोकांना लक्षात येईल आणि आणि त्यांच्या मुक्त अर्थातच निर्बंध येतील.

उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा विचार महापालिकेमध्ये सुरू आहे. अशाच पद्धतीची कारवाई दिल्लीमध्ये सुद्धा सुरू आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या लोकांना घरातच थांबून राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. परंतु हातावर होम quarantine चा शिक्का असलेल्या या व्यक्ती बाहेर राजरोसपणे फिरत असलेल्या असल्याच्या तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. अशा काही मंडळींना रेल्वेमधून ताब्यात सुद्धा घेण्यात आले आहे. सध्या रेल्वे आणि बस वाहतूक जरी सुरू नसली तरी सुद्धा अशी मंडळी बाहेर फिरू शकणाऱ्या बाबतच्या घटना घडू शकतात. या संशयितांना समजा करोना असला तर त्यांच्याकडून या रोगाची लागण इतरांना होऊ शकते.

हे टाळण्यासाठी quarantine केलेल्या व्यक्तींच्या घराबाहेर स्टिकर लावण्याबाबत विचार सुरू आहे असे एका महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र ज्याच्या मध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत उदाहरणार्थ अशा लोकांचा डेटाबेस तयार करणे आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊन प्रत्यक्ष स्टिकर लावणे. सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थिती ती जेमतेम पाच टक्क्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे महानगरपालिकेत ला सुद्धा कर्मचाऱ्यांची वानवा जाणवत आहे पण रस्त्यावरील गर्दी टाळायची असेल तर अशा उपाययोजना करणे हे सरकारला क्रमप्राप्त होते हे लक्षात घ्यायला हवे.