विरोधी पक्षनेत्यांना स्वाइन फ्लू संदर्भात निवेदन करण्यास नकार देणाऱ्या महापौरांविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे शीतल म्हात्रे, पारूल मेहता, अजंता यादव, अनिता यादव, वकारुन्निसा अन्सारी आणि नैना सेठ या नगरसेविकांना महापौर स्नेहल आंबेकर यांनी १५ दिवसांसाठी निलंबित केले.
स्वाइन फ्लूच्या विषयावर निवेदन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. मात्र १२ मार्च रोजी स्वाइन फ्लू संदर्भात सभागृहाची विशेष सभा आयोजित करण्यात आल्याची सबब पुढे करून महापौरांनी मागणी फेटाळून लावली. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. तरीही महापौर कामकाज पुढे रेटत होत्या.  त्यामुळे काम करणे अवघड बनले. अखेरीस नियमांचा आधार घेत उपरोक्त नगरसेविकांना निलंबित करण्यात आले.