News Flash

महापौरांच्या वाहनाला अपघात

विश्वनाथ महाडेश्वर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

वांद्रे येथील खेरवाडी जंक्शन आणि कला नगर जंक्शन दरम्यानच्या सिग्नलवरून पुढे जात असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वाहनावर एक मोटारसायकलने मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास धडक दिली. मोटारसायकलस्वाराने महापौरांच्या चालकाला मारहाण केली असून चालकाच्या डोक्याला मार लागल्याचे समजते. विश्वनाथ महाडेश्वर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

खेरवाडी जंक्शन आणि कला नगर जंक्शन दरम्यानच्या सिग्नलवर महापौरांची गाडी उभी होती. सिग्नल सुरू होताच महापौरांची गाडी पुढे निघाली आणि पाठीमागून भरधाव वेगात आलेली मोटरसायकल महापौरांच्या गाडीला धडकली. रस्त्यावर पडलेल्या मोटरसायकलस्वाराला पाहण्यासाठी महापौरांचा चालक गाडीतून खाली उतरला. त्याला मोटरसायकलस्वाराने मारहाण केली. या अपघातात मोटरसायकलस्वार किरकोळ जखमी झाला.

महापौरांसोबत असलेल्या मंडळींनी मोटरसायकलस्वाराला डॉक्टरांकडे नेले. तेथून तो पसार झाल्याचे महापौरांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 4:02 am

Web Title: mayor vishwanath mahadeshwar car accident
Next Stories
1 तिरंगी लढतीचे भाजपपुढे आव्हान
2 शिवसेना खासदारांमध्ये चलबिचल
3 ज्येष्ठ साम्यवादी नेते यशवंत चव्हाण यांचे निधन
Just Now!
X