आगामी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्यावेळी मैदानाच्या देखभालीसाठी पिण्याचे पाणी वापरणार नाही, अशी हमी शनिवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून उच्च न्यायालयात देण्यात आली. मैदानाच्या देखभालीसाठी पुर्नप्रक्रिया करून पाणी वापरले जाईल, असे एमसीएने सांगितले.

गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने पिण्याचे पाणी आयपीएलकरता वापरता येणार नाही असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर खासगी पाणी विक्रेते किंवा मुंबई मनपाकडून मिळणारे पाणी आयपीएलच्या सामन्यांकरता वापरले जाणार नाही, असे एमसीएने स्पष्ट केले. त्याऐवजी मैदानाच्या देखभालीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाणी वापरले जाईल. एका सामन्यासाठी मैदानावरील पीच आणि स्वच्छतेसाठी साधारण ३ लाख ३० हजार लीटर पाणी लागते, अशी माहिती एमसीएने दिली.

आयपीएलचा लिलाव दरवर्षी होईल, विश्वचषकाची संधी एकदाच येते ! – राहुल द्रविड

हायकोर्टाच्या आदेशानंतर २०१६ साली आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवले होते. ख्यमंत्री दुष्काळ निधीसाठी पाच कोटी आणि दुष्काळग्रस्त भागात मोफत पाणीपुरवठा, हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुचवलेले प्रस्ताव फेटाळत उच्च न्यायालयाने तेव्हा आयपीएलचे १३ सामने महाराष्ट्राबाहेर खेळवायला लावले होते.

यंदा ७ एप्रिल ते २७ मे या कालावधीत आयपीएलचा अकरावा हंगाम खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात सलामीच्या आणि अंतिम सामन्याचा मान मुंबईला देण्यात आलेला आहे. अकराव्या हंगामत आयपीएल सामन्यांच्या वेळात बदल करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स या वाहिनीकडे देण्यात आलेले आहेत. वाहिनीने केलेल्या विनंतीवरुन संध्याकाळच्या सामन्यांची वेळ ही ५ वाजून ३० मिनीटांनी तर रात्रीच्या सामन्यांची वेळ ७ वाजता करण्यात आलेली आहे.