27 October 2020

News Flash

मुंबई-पुणे संघादरम्यानच्या सामन्यासाठी.. ‘एमसीए’ पुन्हा न्यायालयात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अर्जावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘आयपीएल’च्या ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या संघादरम्यान १ मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू द्यावा, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अर्जावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय या सामन्याला हिरवा कंदील दाखवणार की नाही हे बुधवारीच ठरेल.
आयपीएल सामन्यांदरम्यान कित्येक लाख लिटर पाण्याची नासाडी होणार आहे. सध्या राज्य दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे पाण्याची उधळपट्टी थांबवण्यासाठी ‘आयपीएल’ सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश देण्याची मागणी ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या संघटनेने न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तसेच परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला बीसीसीआय वा आयपीएलच्या कुठल्याही संघाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले नाही. उलट सामने इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू केली. पुण्याने ३० एप्रिलनंतरचे सामने विशाखापट्टण्म येथे हलवले आहेत.
मात्र २९ एप्रिल रोजी पुण्यात ‘सुपरजायंट्स पुणे’ आणि ‘गुजरात लायन’ यांच्यादरम्यान सामना होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच १ मे रोजी पुण्यातील मैदानावरच ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांत सामना हलवण्यासाठीची व्यवस्था करणे अशक्य आहे, असा दावा करत १ मे रोजीचा सामना पुण्यातच खेळू द्यावा, अशी विनंती एमसीएने केली आहे.

* २९ एप्रिलला पुण्यात ‘सुपरजायंट्स पुणे’ आणि ‘गुजरात लायन’ यांच्यात सामना
* १ मे रोजी पुण्यातील मैदानावरच ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ यांच्यामध्ये सामना
* दोन दिवसांत सामना हलवण्यासाठीची व्यवस्था करणे अशक्य असल्याने १ मे रोजीचा सामना पुण्यातच खेळू देण्याची एमसीएची विनंती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 5:11 am

Web Title: mca taken mumbai pune ipl match issue in court
टॅग Mca
Next Stories
1 कोयनेचे पाणी शेती व पिण्यासाठी देण्याची मागणी
2 आत्महत्येपूर्वी प्रत्युषाकडून गर्भपात..
3 कोठडीतील मृत्यू रोखायचे तर शीघ्रकोपी पोलिसांना दूर ठेवा!
Just Now!
X