मेधा गाडगीळ यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांचा कार्यकाल महिना अखेरीस संपत असून प्रशासकीयदृष्टय़ा अनन्यसाधारण महत्त्वाच्या अशा या पदावर काम करण्याची संधी महिला अधिकाऱ्याला मिळावी यासाठी राज्यातील महिला सनदी अधिकाऱ्यांनी कंबर कसली असून लवकरच त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
farmers loan subsidies stalled due to indifference of co operative department officials auditors says hasan mushrif
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान सहकार खात्याचे अधिकारी, लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे रखडले – हसन मुश्रीफ

मुख्य सचिव सुमित मलिक हे नियत वयोमानानुसार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर त्यांची नियुक्ती राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून होण्याची आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या खुर्चीत बसण्याची संधी महिला अधिकाऱ्याला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार मलिक यांच्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी. एस मदान यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे गाडगीळ या मुख्य सचिव पदाच्या प्रबळ दावेदार असल्या तरी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांना राज्य सरकारची पसंती असल्याची चर्चा आहे. त्यातच या पदाचे आणखी एक दावेदार आणि मुख्यमंत्र्याच्याच नागपूरचे असलेले श्रीवास्तव हेही प्रयत्नशील असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

गाडगीळ यांचे पती काँग्रेसशी सबंधित असल्याने त्यांची संधी डावलली जाऊ शकते. त्यामुळेच गाडगीळ यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन आपले पती राजकीय पक्षाशी संबधित असले तरी आपण कधीही पक्षीय राजकारणाशी संबधित नसून प्रशासकीय अनुभवाचा आणि सेवा ज्येष्ठतेचा विचार व्हावा अशा भावना मुख्यमंत्र्याकडे मांडल्या. त्यावर मुख्य सचिवपदाबाबत सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी गाडगीळ यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र राज्यात आजवर नेहमीच महत्त्वाच्या पदापासून महिला अधिकाऱ्यांना डावलले जात असल्याने आता मात्र प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी महिला अधिकाऱ्यांनी सुरू केली असून महिला अधिकारी हक्कासाठी एकत्र आल्या आहेत. त्यानुसार मुख्य सचिव नियुक्तीमध्ये सेवाज्येष्ठतेचा विचार करावा, केवळ महिला अधिकारी म्हणून डावलले जाऊ नये, आम्हालाही काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्याचा निर्णय या महिला अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.