श्रीमंत बाजीराव मस्तानी चित्रपटात विपर्यस्त इतिहास मांडला आहे. बाजीराव, त्यांच्या पत्नी काशीबाई, मस्तानी यांच्या व्यक्तिरेखा चुकीच्या पध्दतीने दाखविल्या असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी पुण्यातील आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांनी उचित कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असल्या तरी सरकारकडे चित्रपटांचे प्रदर्शन रोखण्याचा अधिकारच नसल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले. या चित्रपटात बाजीराव पेशवे मल्हारी गाण्यावर नृत्य करताना दाखविले आहेत. केवळ ४१ वष्रे आयुष्य लाभलेल्या बाजीराव यांनी २१ वर्षे लढाया करुन त्या सर्व जिंकल्या. त्यांना नृत्य करताना दाखविणे चुकीचे आहे. काशीबाई व मस्तानी यांचे एकत्रित नृत्य हे असंभव आहे, असे त्या म्हणाल्या.