मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून मिळालेल्या चौकशीच्या आश्वासनानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी शनिवारी आपले आमरण उपोषण मागे घेतले. सांताक्रूज-खार येथील गोळीबार परिसरातील ‘झोपू’ योजनेची चौकशी सुरू असताना तेथील घरे पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ पाटकर यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू केले होते.  शुक्रवारी रात्री पाटकर यांच्या सहकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री चव्हाण यांनी चर्चा केली. या वेळी ‘झोपू’प्राधिकरणाचे प्रशासकीय अधिकारी निर्मल देशमुख, गृहनिर्माण सचिव देवाशिष चक्रवर्ती हे ही उपस्थित होते.