News Flash

पोलिसांनी दिलेल्या माहितीवर माध्यमांनी बातम्या केल्या तर बदनामी कशी?; हायकोर्टाचा शिल्पाला सवाल

राज कुंद्रा प्रकरणी बातम्या देणाऱ्या माध्यमांविरोधात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

media has reported on the information of the police how can it be defamed High Court questions Shilpa Shetty

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर समाजमाध्यमे व संकेतस्थळांवरून मानहानीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मज्जाव करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेत शिल्पाने समाजमाध्यमांसह वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांना प्रतिवादी केले होते. राज कुंद्राचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळल्यानंतर शिल्पाने ही याचिका केली होती. दरम्यान या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

माध्यमांमध्ये दिलेल्या बातम्या या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून आहेत. त्याला आव्हान कसं दिलं जाऊ शकतं? तो बदनामीचा प्रकार कसा म्हटला जाऊ शकतो? हे म्हणजे शिल्पा शेट्टीविषयी काहीच बोलू नका, असं सांगण्यासारखं आहे. शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यांच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते आणि माध्यमांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा प्रकरणात झालेल्या चौकशीविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या असतील तर त्याविषयी बदनामीचा दावा कसा होऊ शकतो?,’ असा प्रश्न न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना विचारला होता.

हायकोर्टाने वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना सांगितले की, तुमच्या अशीलच्या पतीविरोधात गुन्हा दाखल आहे आणि हे कोर्ट कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. कोणीही आपला अशील असू शकतो, परंतु बदनामीसाठी कायदा आहे.

वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित वृत्त अधिक रंजक करून प्रसिद्ध केले जाते, त्यामुळे प्रतिवाद्यांना आपल्याविषयी चुकीचे आणि मानहानी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी शिल्पाने याचिकेत केली होती. आपल्याबाबतची चुकीची माहिती संकेतस्थळांवरून काढून टाकावी, समाजमाध्यावरूनही याबाबते व्हिडिओ हटवण्यात यावेत, तसेच माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिल्पाने केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 3:56 pm

Web Title: media has reported on the information of the police how can it be defamed high court questions shilpa shetty abn 97
Next Stories
1 पार्सलला पाय लागल्याच्या भांडणातून डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण; चार शिवसैनिकांना अटक, दोघे फरार
2 वरळीकिनारी बेकायदा बांधकामे
3 अंथरुणास खिळलेल्यांचे आजपासून घरोघरी लसीकरण
Just Now!
X