मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरु होती जी नुकतीच संपली आहे. या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. CAA ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावर या बैठकीत चर्चा होते आहे अशी चर्चा आहे. तसंच अधिवेशनात काय काय करायचं याबाबतही चर्चा सुरु आहे असंही समजतं आहे. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर CAA हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे घेण्याचा नाही या कायद्याला घाबरण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. हा विषय या बैठकीत चर्चिला जाण्याची शक्यता आहे.

एक तासापासून ही बैठक सुरु होती. या बैठकीत जयंत पाटील संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. ही बैठक संपवून शरद पवार आणि अजित पवार हे बाहेर पडले आहेत. दिल्लीवारीनंतर CAA, NRC वर जी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली त्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशावरही चर्चा झाली आहे असंही समजतं आहे. मात्र CAA आणि NRC या दोन मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.