News Flash

मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक , पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा

मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कारणासाठी रविवारी मेगाब्लॉक

मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कारणासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटीहून स. ९.२५ ते दु. २.५४ कालावधीत डाऊन जलद आणि अर्धजलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावरही थांबतील. ठाण्यापुढे सर्व जलद लोकल ठाणे आणि कल्याणमध्ये सर्व स्थानकांवर थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप जलद आणि अर्धजलद लोकल सेवा स. १०.३७ ते दु. ३.०६ पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकावरही थांबतील. या ब्लॉकमुळे लोकल सेवा सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडपासून वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावरून सुटणाऱ्या सर्व गाड्या, तसेच सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३पर्यंत सीएसएमटीपासून वांद्रे/अंधेरी/गोरेगाव मार्गावरून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२०पर्यंत पनवेल/बेलापूर/ वाशीपासून सीएसएमटीला सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द केल्या आहेत. सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ वाजेपर्यंत अंधेरी/ वांद्रे/गोरेगावपासून सीएसएमटीकडे अप हार्बर मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. दरम्यान, ब्लॉकदरम्यान पनवेल-कुर्ला मार्गावरून विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील सर्व प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करता येईल.

तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12.50 ते दुपारी 4.50 वाजेपर्यंत बोरिवली ते भाईंदर स्थानकांमध्ये मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारचा दिवसाचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 8:06 am

Web Title: mega block at mumbai central and harbour line
Next Stories
1 निवासी डॉक्टर, परिचारिकेला मारहाण
2 ‘मग, बारावीनंतर कुठं जाणार?’
3 कर्नाटकातील भाजपच्या पराभवामुळे शिवसेना खूश
Just Now!
X