रविवारी पुणे, मनमाडपर्यंतचा प्रवास जपून; पूल पाडकामामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

कुर्ला ते शीव स्थानकादरम्यान असलेला पादचारी पूल पाडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल गाडय़ांबरोबर हार्बर तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. रविवारी तर पुणे आणि मनमाडपर्यंत धावणाऱ्या एक्स्प्रेस गाडय़ा रद्द करतानाच अन्य मार्गावरील गाडय़ांमध्येही बदल केले आहेत. ब्लॉकदरम्यान हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द दरम्यान अप व डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंदच राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

कुर्ला ते शीवदरम्यान ब्लॉकवेळी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत, अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ५.३०, डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.३० आणि अप व डाऊन धीम्या मार्गावर मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल गाडय़ा शनिवारी रात्री १०.५८ ते पहाटे मध्यरात्री १२.४० पर्यंत बंद राहतील. त्यानतंर पहाटे ४.३२ ते पहाटे ५.५६ पर्यंत पुन्हा लोकल गाडय़ा बंदच ठेवण्यात येणार आहेत, तर अप मार्गावरील लोकल गाडय़ाही याच कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल गाडय़ा चालविण्यात येतील.

रविवारी पुणे, मनमाडच्या मेल-एक्स्प्रेस रद्द

पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी-मनमाड एक्स्प्रेस राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

दादपर्यंतच चालविण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस

  • ट्रेन नंबर ११०५८ अमृतसर-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, ट्रेन ५१०३४ साईनगर शिर्डी ते सीएसएमटी मुंबई फास्ट पॅसेंजर्स, ट्रेन १६३८२ कन्याकुमारी-सीएसएमटी मुंबई जयंती जनता एक्स्प्रेस, १२८१० हावडा-सीएसएमटी मुंबई मेल आणि ट्रेन १२१०६ गोंदिया-सीएसएमटी मुंबई विदर्भ एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच चालविण्यात येतील.
  • रविवारी मुंबईत येणाऱ्या चैन्नई मुंबई मेल, कोणार्क एक्स्प्रेस, हुस्सेनसागर एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, सिध्देश्वर एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, पंजाब मेल, दुरोन्तो एक्स्प्रेस या एक ते दोन तास उशिराने पोहोचतील.
  • रविवारी सीएसएमटी ते मडगाव गाडी सकाळी ७.१० च्या ऐवजी सकाळी ९.०५ वाजता सुटेल. तर सीएसएमटीहून सुटणारी उद्यान एक्स्प्रेस सकाळी ८.०५ च्या ऐवजी सकाळी १०.१० वाजता सुटणार आहे.