मध्य रेल्वे
कधी- रविवार,१३, सकाळी ११.१० ते दुपारी ३.४०
कुठे- कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर
परिणाम- सकाळी ११.२२ ते दुपारी ३.४२ या वेळेत कल्याण अप जलद मार्गावरील सर्व गाडय़ा कल्याण ते ठाणे या दरम्यान अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे अप जलद मार्गावरील सर्व गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा आदीं स्थानकांवर थांबणार आहेत.
सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून डाऊन जलद दिशेने जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबा देण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे
कधी- रविवार, १३, सकाळी ११.०० ते दुपारी ३.००
कुठे- पनवेल ते नेरुळ अप आणि डाऊन मार्ग
परिणाम- सकाळी १०.४३ ते दुपारी ३.२७ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलहून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा पनवेल आणि नेरुळदरम्यान बंद राहील. तर सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१७ या कालावधीत पनवेल नेरुळहुन सुटणारी डाऊन मार्गावरील सेवा बंद राहिल.
सकाळी ११.०५ ते दुपारी ३.१९ या वेळेत ठाणे आणि पनवेलहून अप ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक पनवेल आणि नेरुळ दरम्यान बंद. सकाळी ११.४२ ते दुपारी २.४८ कालावधीत ठाणेहून पनवेलदरम्यान आणि नेरुळहून डाऊन ट्रान्सहार्बर मार्ग सुटणाऱ्या सेवा नेरुळ आणि पनवेलदरम्यान बंद. तसेच पनवेल-अंधेरीदरम्यान सर्व सेवा बंद राहणार. परंतु हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नेरुळ आणि नेरुळ ते ठाणेदरम्यान विशेष लोकल सेवा चालण्यात येईल.

पश्चिम रेल्वे
कधी- रविवार, १३ डिसेंबर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
कुठे- बोरिवली आणि गोरगाव अप आणि डाऊन मार्ग
परिणाम- ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या लोकल बोरिवली आणि गोरेगावदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे. याशिवाय ब्लॉक काळात बोरिवली स्थानकात येणाऱ्या गाडय़ा फलाट क्रमांक ३, ४, ५, ६ आणि ६ ए आदी कोणत्याही स्थानकांवर थांबवण्यात येतील.