*कुठे – सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर
*कधी- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
*परिणाम – चर्चगेटकडे येणाऱ्या आणि विरारकडे जाणाऱ्या सर्व धिम्या गाडय़ा जलद मार्गावरून वळवण्यात येतील. काही सेवा रद्द करण्यात येणार असून एकंदरीत वाहतूक १०-१५ मिनिटे उशिराने चालेल.
*कुठे – ठाणे आणि कल्याण या स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर
*कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वा.
*परिणाम – कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या गाडय़ा मुलुंड ते कल्याण दरम्यान जलद मार्गावरून धावतील. या गाडय़ा ठाणे- कल्याण दरम्यान डोंबिवलीशिवाय कोणत्याही स्थानकांवर थांबणार नाहीत. डाउन व अप जलद गाडय़ा नेहमीच्या थांब्यांसह विक्रोळी, भांडूप, मुलुंड या स्थानकांवर थांबतील.
*कुठे – कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान अप मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर
*कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
*परिणाम – सीएसटी ते अंधेरी व वांद्रे या दरम्यानची वाहतूक बंद राहील. कुल्र्याहून सीएसटीकडे येणाऱ्या गाडय़ा मुख्य मार्गावरून दादरमार्गे मुंबईला येतील. या गाडय़ा शीव, माटुंगा, दादर, परळ, भायखळा, सँडर्हस्ट रोड, मस्जिद या स्थानकांवर थांबतील.