13 August 2020

News Flash

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

रविवारी हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

 

मध्य रेल्वे

कधी- रविवारी, ३ एप्रिल, सकाळी ११.०० ते दुपारी ३.००

कुठे- ठाणे-कल्याण डाऊन जलद मार्गावर

परिणाम- सकाळी ९.३८ ते दुपारी २.२५ या वेळेत डाऊन जलद मार्गावरील सर्व सेवा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबणार आहेत. तर ठाणे डाऊन जलद मार्गावरील सेवा सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. तर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सर्व लोकल डाऊन धीम्या मार्गावर थांबणार आहेत. या ब्लॉक काळात सर्व सेवा नियमित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने धावतील. ठाणेहून सुटणाऱ्या जलद लोकल नियोजित थांब्याव्यतिरिक्त मुलुंड, भाडुंप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. सर्व डाऊन आणि अप धीम्या लोकल छत्रपती शिवाजी टर्मिनसला १० मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. तर रविवारी हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वे

कधी- शनिवारी / रविवारी रात्री १२.५० ते ४.५०

कुठे- बोरिवली आणि भाईंदर अप आणि डाऊन

परिणाम- ब्लॉक काळात अप आणि डाऊन मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकचा कालावधी मध्यरात्रीचा असल्याने फार फरक पडणार नसल्याचे सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2016 3:43 am

Web Title: mega block in western and central railway
Next Stories
1 बच्चू कडू यांचे शासकीय कर्मचाऱ्यांवर शरसंधान
2 ‘अगदीच बच्चू’ या अग्रलेखावर मत मांडण्याची संधी
3 नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबई बहरली
Just Now!
X