27 October 2020

News Flash

अंधेरी स्थानकात विशेष ब्लॉक

हार्बरच्या विस्तारीकरणासाठी उद्यापासून ६ जूनपर्यंत रोज ४० सेवा रद्द

हार्बरच्या विस्तारीकरणासाठी उद्यापासून ६ जूनपर्यंत रोज ४० सेवा रद्द
हार्बर मार्गाचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण करण्याच्या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या अंधेरी स्थानकातील हार्बर मार्गाच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. पश्चिम रेल्वे या कामासाठी २९ मे ते ६ जून या कालावधीत विशेष ब्लॉक घेणार आहे. या ब्लॉकमुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या तब्बल ४० सेवा दर दिवशी रद्द होणार आहेत.
अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहा आणि सात हे नऊ दिवस रेल्वे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. या दरम्यान सध्याचे सहा आणि सात क्रमांकांचे प्लॅटफॉर्म पाडून ते सध्याच्या प्लॅटफॉर्मच्या पुढील बाजूस बांधण्यात येणार आहेत.
या नऊ दिवसांमध्ये अंधेरी-चर्चगेट यांदरम्यानच्या ३० आणि अंधेरी-सीएसटी यांदरम्यानच्या १०, अशा एकूण ४० सेवा दर दिवशी रद्द होणार आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरून सुटणाऱ्या पाच सेवा प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून रवाना होणार आहेत.

Untitled-17

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 2:25 am

Web Title: mega block mumbai railway 2
टॅग Mega Block
Next Stories
1 मुंबईहून आज शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता
2 जादा रूळांसाठी पुलांवर घाला!
3 प्रभादेवीतील कामगार नगरवासीयांचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी!
Just Now!
X