News Flash

रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी ब्लॉक

विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या भाईंदर ते वसई रोडदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे. हार्बरवर उपनगरी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर उपनगरी रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे- मुख्य मार्ग

कुठे – कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

कधी – स. ११.२० ते दु. ३.५० वा.

परिणाम – सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर ठाणेपासून पुन्हा जलद मार्गावर उपनगरी रेल्वे चालवण्यात येणार आहेत. या वेळी मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकांत जलद गाडय़ा थांबतील.

हार्बर मार्ग

कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर

कधी – अप मार्ग- स. ११.१० ते दु. ३.४० आणि डाऊन मार्ग- स. ११.४० ते दु. ४.१० वा.

परिणाम – सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे, गोरेगावदरम्यानची उपनगरी रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष रेल्वे फेऱ्या सोडण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे – भाईंदर ते वसई रोडदरम्यान अप व डाऊन जलद मार्ग

कधी – स. ११.०० ते दु. ३.००

परिणाम – ब्लॉकमुळे अप जलद रेल्वे विरार, वसई रोड ते भाईंदर, बोरिवलीदरम्यान अप धिम्या मार्गावर, तर डाऊन जलद गाडय़ा बोरिवली ते वसई रोड, विरारदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर धावतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 3:20 am

Web Title: mega block on all three routes of railway local train on sunday zws 70
Next Stories
1 पावसाने रस्ताकोंडी ; मुंबईसह उपनगरांमध्ये वाहतुकीचा खोळंबा
2 सागरी किनारा मार्ग प्रकल्पावरील स्थगिती कायम
3 मोदींना पत्र लिहिणाऱ्यांविरोधात ६१ मान्यवर सरसावले
Just Now!
X