कुठे – माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर
कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
परिणाम – मेगा ब्लॉकदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबा घेत जातील. विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर गाडय़ा थांबणार नाहीत. प्रवाशांना घाटकोपर, भांडुप व मुलुंडवरून प्रवास करण्याची मुभा आहे. अप जलद मार्गावरील गाडय़ा सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२८ या दरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. मेगा ब्लॉकदरम्यान सर्व गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावतील.

कुठे – कुर्ला ते सीएसटी आणि वडाळा रोड ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर.
कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
परिणाम – वांद्रे, अंधेरी ते सीएसटीदरम्यानची वाहतूक मेगा ब्लॉकदरम्यान बंद राहील. कुर्ला येथून सीएसटीसाठी सुटणाऱ्या सर्व गाडय़ा सकाळी ११.०८ ते दुपारी ३.२० दरम्यान मुख्य जलद मार्गावरून भायखळापर्यंत जातील. सायन, माटुंगा, दादर व परेल येथे या गाडय़ा थांबतील. मेगा ब्लॉकदरम्यान सर्व गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे विलंबाने धावतील. वांद्रे, अंधेरी ते सीएसटीदरम्यानच्या प्रवाशांना मध्य व पश्चिम रेल्वेवरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

मेट्रोचाही मेगा ब्लॉक
रेल्वेप्रमाणे मेट्रोनेही आता नियमित मेगा ब्लॉक घेण्यास सुरुवात केली असून आज, रविवारी सकाळी साडेपाचऐवजी साडेसात वाजल्यापासून वर्सोवा- अंधेरी- घाटकोपरदरम्यान फेऱ्या सुरू होतील.