मध्य रेल्वे
*कधी : रविवार, १० जुलै २०१४, सकाळी १०.४५ ते दु़  ३.१५
*कुठे : मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर
*परिणाम : छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सकाळी १०.०८ ते दुपारी २.५१ या काळात डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा माटुंग्यापर्यंत धिम्या मार्गावरुन सोडण्यात येणार आहेत. तसेच सायन ते मुलुंड दरम्यान या गाडय़ा प्रत्येक रेल्वे स्थानकात थांबणार आहेत. त्यामुळे या गाडय़ा २० मिनिटे विलंबाने धावतील.
ठाणे येथून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२५ या कालात ठाणे येथून जलद मार्गावरील गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. मात्र या गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबाने धावतील. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत सोडण्यात येणाऱ्या सर्व धिम्या गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे
*कधी : रविवार, १० जुलै २०१४. सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
*कुठे : कुर्ला ते सीएसटी अप व वडाळा रोड ते माहीम अप मार्ग
*परिणाम : मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सकाळी १०.२० ते दुपारी ३.३३ या काळात डाऊन मार्गावरून वांद्रे आणि अंधेरीसाठी सोडण्यात येणाऱ्या, तसेच वांद्रे आणि अंधेरी येथून अप मार्गावरुन सकाळी १०.४० ते दुरापी ३.१७ या काळात छत्रपती टर्मिनससाठी सोडण्यात येणाऱ्या गाडय़ा बंद ठेवण्यात येणार आहेत.  
कुर्ला येथून छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान अप मार्गावरील गाडय़ा सकाळी ११.०८ ते दुपारी ३.२० या काळात मेन लाईनवरुन धावतील. या गाडय़ा करीरोड आणि चिंचपोकळी येथे थांबणार नाहीत.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन हार्बर मार्गावरील अप-डाऊन मार्गावरुन सोडण्यात येणाऱ्या व पोहोचणाऱ्या रेल्वे गाडय़ा १० मिनिटे विलंबाने धावतील.
हार्बर मार्गावरून वांद्रे आणि अंधेरी येथे जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाईनवरुन अथवा पश्चिम रेल्वेतून प्रवास करण्याची परवनागी देण्यात आली आहे.