मध्य रेल्वे 
कुठे : माटुंगा ते मुलुंड यांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वा.
परिणाम : ब्लॉकदरम्यान माटुंगा ते मुलुंड यांदरम्यान डाऊन धीम्या गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवरच थांबतील. मुलुंडपुढे या गाडय़ा पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच अप व डाऊन जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. तसेच या दरम्यान सर्वच गाडय़ांची वाहतूक वेळापत्रकापेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू राहील.

हार्बर रेल्वे
कुठे : वाशी ते बेलापूर यांदरम्यान अप व डाऊन मार्गावर
कधी : पहाटे २.०० ते सकाळी १०.०० वा.
परिणाम : ब्लॉकदरम्यान वाशी ते बेलापूर यांदरम्यान वाहतूक बंद असेल. परिणामी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाशी आणि बेलापूर ते पनवेल यादरम्यानच गाडय़ा चालतील. तसेच ब्लॉकनंतर मुंबईहून पनवेलकडे पहिली गाडी सकाळी ८.२३ वाजता रवाना होईल. तर पनवेलहून मुंबईसाठी सकाळी ९.१० वाजता गाडी सुटेल. तसेच ठाण्याहून पनवेलला जाणारी पहिली गाडी सकाळी ११.१२ वाजता सुटेल.
पश्चिम रेल्वेवर सकाळच्या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र रात्रीच्या वेळी बोरिवली यार्डमध्ये रात्री १२.०५ ते सकाळी ५.०५ यांदरम्यान विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवरील या ब्लॉकदरम्यान काही सेवा रद्द राहतील.
महिनाभरात रेल्वेची फक्त सहाच तिकिटे ऑनलाइन मिळणार
मुंबई : रेल्वे तिकीट आरक्षणात तिकीट दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी आयआरसीटीसीने नवीन नियम आखले आहेत. या नियमानुसार आता खासगी लॉग इनवरून एका महिन्याभरात केवळ सहाच तिकिटे ऑनलाइन काढता येणार आहेत. हा निर्णय येत्या १५ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे दर आठवडय़ाला मुंबई-पुणे किंवा मुंबई-नाशिक ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होणार आहे.