*कुठे- रविवार, ३० नोव्हेंबर, ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर
*कधी- सकाळी १० ते दुपारी ३
*परिणाम- ठाणे ते कल्याण रेल्वेस्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सकाळी ९.०८ ते दुपारी २.२५ कालावधीत डाऊन धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. तर सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२८ या कालावधीत ठाण्यापासून छत्रपती शिवाजी टर्मिसकडे जाणाऱ्या अप जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांखेरीज मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवरही थांबणार आहेत. ११.२१ ते दुपारी २.४३ या वेळेत डाऊन मेल एक्स्प्रेस ठाण्यापासून पुढे धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.  लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ११.४० वाजता सुटणारी नेत्रावती एक्स्प्रेस-डाऊन (क्रमांक १६३४५)ही गाडी बदललेल्या वेळेत म्हणजे दुपारी २.३० वाजता सुटणार आहे.
*कुठे-रविवार, ३० नोव्हेंबर २०१४, कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन
*कधी- सकाळी ११ ते दुपारी ३ परिणाम-पनवेल, बेलापूर, वाशी येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पनवेल, बेलापूर, वाशीकडे जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांची वाहतूक अनुक्रमे सकाळी १०.२३ ते दुपारी ३.०१ व सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत हार्बर रेल्वेवरील प्रवाशाना हार्बर आणि मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

*कुठे- रविवार, ३० नोव्हेंबर २०१४, सांताक्रूझ ते माहीम जंक्शन अप आणि डाऊन जलद मार्गावर.
*कधी- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ ’परिणाम- मेगा ब्लॉकच्या कालावधीत सांताक्रूझ ते माहीम रेल्वे स्थानकादरम्यानची अप आणि डाऊन जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ांची वाहतूक धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे.