रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर शनिवारी रात्री सहा तासांचा विशेष ब्लॉक घेतल्यानंतर रविवारी मेगाब्लॉक नसेल. तसेच पश्चिम रेल्वेवरही शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसा मेगाब्लॉक नसेल.

* कुठे – ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाउन जलद मार्गावर
* कधी – सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० वा.
* परिणाम – ब्लॉकदरम्यान डाउन जलद मार्गावरील वाहतूक ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाउन धीम्या मार्गावरून चालवली जाईल. या गाडय़ा ठाणे-कल्याण यांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच डाउन तसेच अप जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील.
अप-डाउन धीम्या आणि जलद मार्गावर धावणाऱ्या सर्व गाडय़ा वेळापत्रकापेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

‘आधार’ला वैधानिक दर्जा
नवी दिल्ली : आधारला वैधानिक दर्जा देणारे विधेयक लोकसभेत संमत झाले. त्यामुळे सरकारी अनुदान आधारच्या माध्यमातून देण्याने सरकारचे कोटय़वधी रुपये वाचतील, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. या विधेयकामुळे राज्यांना पात्र व्यक्तींना अनुदान वाटप करता येणार आहे, असे जेटली यांनी ‘आधार’बाबत चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केले. हे विधेयक संमत झाल्याने केंद्राचे २० हजार कोटी रुपये वाचणार आहेत.