पश्चिम रेल्वेवर रविवारी, २४ मार्चला कोणताही ब्लॉक नाही. मध्य रेल्वे आणि हार्बर लाइनवर मात्र दुरुस्ती कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर आणि कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल, त्यामुळे लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे: ठाणे ते कल्याण डाऊन धीमा मार्ग

कधी: रविवार, २४ मार्च. स.१०.३० ते दु.४ वा.

परिणाम: ठाणे ते कल्याण ते दिवा डाऊन धीम्या मार्गावरील मेगाब्लॉकमुळे सकाळी १०.४७ पासून दुपारी ३.५० पर्यंत मुलुंडहून सुटणाऱ्या धीम्या आणि सेमी फास्ट लोकल सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. सकाळी १०.३७ पासून दुपारी ०३.०६ पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या जलद आणि सेमी फास्ट लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबतील. या ब्लॉकदरम्यान कल्याण स्थानकातून कसाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पादचारी पूल तोडण्याचे काम केले जाणार आहे.

हार्बर मार्ग

कुठे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, वाशी दोन्ही मार्गावर

कधी: रविवार, २४ मार्च. डाऊन मार्ग  स.११.१० ते दु.३.४० वा. आणि अप मार्ग- १०.२१ ते दु.३.०० वा.

परिणाम: कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल या मार्गावरील लोकल फे ऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फे ऱ्या धावतील.