पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची मात्र मेगा ब्लॉकमधून सुटका

रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यासह अन्य तांत्रिक कामांसाठी २८ जानेवारी (रविवार) रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक नाही.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

* कधी : रविवार, २८ जानेवारी, सकाळी १०.३० ते दुपारी ३.३०

* कुठे : ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर

* परिणाम : ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या जलद आणि अर्ध जलद उपनगरी गाडय़ा मेगा ब्लॉक काळात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुम्ंड स्थानकात थांबणार आहेत.

हार्बर रेल्वे

* कधी : रविवार, २८ जानेवारी, सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० आणि सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

* कुठे : कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर

* परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर आणि वाशीपर्यंतच्या अप आणि डाऊन मार्गावरील उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. मेगा ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष उपनगरी गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.