सिग्नल, ओव्हरहेड वायर यासह अन्य काही कामांसाठी १५ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण ते ठाणे अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बरवर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरही ब्लॉकचे काम चालेल.

पश्चिम रेल्वे

’ कधी :  शनिवार, १४ एप्रिल २०१८. मध्यरात्री १२.०० ते पहाटे ५.०० वा.

’ कुठे: माटुंगा रोड ते मुंबई सेन्ट्रल अप आणि डाऊन जलद मार्ग

’ परिणाम : ब्लॉक काळात अप जलद मार्गावरील लोकल गाडय़ा अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नाही.

हार्बर रेल्वे

कधी: रविवार, १५ एप्रिल, स. ११.१० ते सायं. ४.१० वा

कुठे: कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्ग

परिणाम: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या लोकल गाडय़ा आणि येणाऱ्या  गाडय़ाही रद्द करण्यात येतील.

मध्य रेल्वे

कधी: रविवार, १५ एप्रिल, स.११.२० ते सायं.४.२० वा

कुठे: कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर

परिणाम:  कल्याण ते मुलुंड दरम्यान अप धिम्या मार्गावरील लोकल गाडय़ा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. अप धिम्या मार्गावरील लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकात थांबणार नाही.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल गाडय़ा ब्लॉक काळात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील.