रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवार रात्र आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या रविवारी हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक होणार नसल्याचेही मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ब्लॉकदरम्यान काही सेवा रद्द राहणार असून उर्वरित सेवा वेळापत्रकापेक्षा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

  • कुठे : विद्याविहार ते ठाणे यांदरम्यान डाउन जलद मार्गावर
  • कधी : सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० वा.
  • परिणाम : ब्लॉकदरम्यान सर्व डाउन जलद गाडय़ा माटुंगा ते मुंब्रा यांदरम्यान डाउन धीम्या मार्गावरून धावतील. या गाडय़ा या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. त्यापुढे दिव्यापासून या सर्व गाडय़ा पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्याशिवाय ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या सर्व जलद गाडय़ा त्यांच्या वेळापत्रकातील थांब्यांशिवाय ठाण्यापुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवर थांबतील.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल यांदरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर
  • कधी :  शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ४.४० वा.
  • परिणाम : ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावरील गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान अप व डाउन जलद मार्गावरून धावतील.