रेल्वे रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेमार्गावरील सांताक्रूझ व गोरेगाव स्थानकांदरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर दिवा ते कल्याणदरम्यान जलद  मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप जलद व पाचव्या मार्गावर
  • कधी : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ३.३० वा.
  • परिणाम – ब्लॉक काळात सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप मार्गावरील जलद गाडय़ा धीम्या मार्गावरून धावतील. याचबरोबर पाचच्या मार्गावरून जाणाऱ्या डाऊन एक्स्प्रेस गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील.

मध्य रेल्वे

  • कुठे : दिवा ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर
  • कधी : सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वा.
  • परिणाम : या कामादरम्यान डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा ठाण्यानंतर डाऊन धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तर सकाळी ९.२५ ते दुपारी २.५४ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद गाडय़ांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

हार्बर मार्ग

  • कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे
  • कधी : सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वा.
  • परिणाम : सकाळी ११.४७ वाजता वडाळा रोड ते पनवेल या गाडीपासून सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाडीपर्यंत सर्व सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या दरम्यान कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. तर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे या दरम्यानच्या सर्व सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.