रेल्वे मार्गाची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल आणि इतर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील गाडय़ा वेळापत्रकापेक्षा १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेवर शनिवार/रविवार यादरम्यान मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने याचा वाहतुकीवर परिणाम होणार नाही.

हार्बर मार्ग
कुठे?- नेरुळ ते मानखुर्द अप आणि डाउन मार्गावर
कधी ?-स.११.०० ते दु.२.४५
परिणाम- ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल/ बेलापुर/ वाशी या अप आणि डाउन मार्गावर सर्व सेवा रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द आणि ठाणे-पनवेल यांदरम्यान काही विशेष सेवा चालवण्यात येतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर वा मुख्य मार्गावरून त्याच तिकिटावर प्रवास करता येणार आहे.