’मध्य रेल्वे

’कुठे – कल्याण ते ठाणे या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर

’कधी? – सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वा.

’परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या अप धिम्या आणि अर्धजलद गाडय़ा कल्याण ते ठाणे या स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाडय़ा ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवर जाण्यासाठी प्रवाशांनी ठाणे अथवा डोंबिवली येथे उतरून डाऊन धिम्या गाडीने प्रवास करावा. ठाण्यानंतर या गाडय़ा पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुंबईहून सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ा ब्लॉकदरम्यान त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवरही थांबतील. तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील.

’हार्बर रेल्वे

’कुठे? – मशीद ते चुनाभट्टी या स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम या स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर

’कधी? सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वा.

’परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई ते पनवेल आणि मुंबई ते अंधेरी या दरम्यानच्या सर्व सेवा बंद असतील. पनवेल ते कुर्ला या दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. तसेच अंधेरी-मुंबई यादरम्यानच्या प्रवाशांना पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा असेल.

’पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेतला असल्याने त्याचा परिणाम उपनगरीय सेवेवर होणार नाही. तसेच पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसभर सेवा नेहमीप्रमाणेच सुरू राहतील.