मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर विविध कामांसाठी रविवार, २५ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत, तर हार्बर मार्गावरील काही रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसभर ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

* वेळ : २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२.३० ते २५ फेब्रुवारी पहाटे ४.०० पर्यंत.

* कुठे : वसई रोड ते भाईंदर

*  परिणाम : वसई रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.०० पर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

मध्य रेल्वे

* वेळ: सकाळी ११.२० ते दुपारी ४.२०.

’ कुठे : कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर

* परिणाम : कल्याण येथून अप धिम्या / अर्ध जलद मार्गावरील रेल्वे गाडय़ा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.१४ या वेळेत कल्याण आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून सोडण्यात येणार आहेत.  ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांवर अप धिम्या मार्गावर रेल्वे गाडय़ा थांबणार नाहीत.

हार्बर मार्ग

* वेळ : सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३०

* कुठे : पनवेल – मानखुर्द अप आणि डाऊन मार्ग

* परिणाम : पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३८ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी अप मार्गावर सोडण्यात येणाऱ्या, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.४४ या वेळेत पनवेल / बेलापूर / वाशीसाठी डाऊन मार्गावर सोडण्यात येणाऱ्या सर्व लोकलगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल – ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेलहून सकाळी ११.०२ ते दुपारी ४.२६ दरम्यान, तसेच ठाणे – पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी ११.१४ ते दुपारी ४ या वेळेत सोडण्यात येणाऱ्या लोकलगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात पनवेल – अंधेरी सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे.