News Flash

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक, प्रवाशांचे होणार मेगाहाल

प्रवाशांचे मेगाहाल होणार असल्याचे दिसून येत आहे.  

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक, प्रवाशांचे होणार मेगाहाल
संग्रहित छायाचित्र

रुळांच्या दुरुस्तीचे काम आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी रोल्वे मार्गाच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तिन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने प्रवाशांचे मेगाहाल होणार असल्याचे दिसून येत आहे.

मध्य रेल्वेवर ठाणे -कल्याण दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंतचा हा ब्लॉक असेल. परिणामी ब्लॉककाळात सर्व लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या ११ ते ५ वाजेपर्यंत १० मिनिटे उशिराने धावण्याची शक्याता आहे.

हार्बर मार्गावर कुर्ला -वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११.१० ते दु. ३.४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. परणामी ब्लॉककाळात कुर्ला-वाशी मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी – कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली – अंधेरी दरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ या काळात ब्लॉक घेम्यात आला आहे. ब्लॉक काळातील सर्व जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

दरम्यान, हुसेनसागर एक्स्प्रेस गाडीचं इंजिन अंबरनाथ-बदलापूरमध्ये बंद पडल्यामुळे त्या मार्गावरील सर्व एक्स्प्रेस गाड्या खोळबंल्या आहेत. परिणामी कर्जतवरुन मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे पाऊण ते एक तास उशीरा असल्याचे समजतेय. शिवाय सोलापूरहून येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस पनवेल-कर्जतमार्गे वळवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2019 7:34 am

Web Title: mega block on local train
Next Stories
1 मुंबईत तीव्र पडसाद
2 धर्मादाय रुग्णालयांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष
3 ‘अपरिचित पुलं’नी रसिक भारावले
Just Now!
X