मध्य रेल्वे
कधी – सकाळी ११.१५ ते दुपारी ३.३५
कुठे – मुलुंड आणि माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर.
परिणाम – अप मार्गावरील सर्व धीम्या गाडय़ा मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावरून. या गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबतील. नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांवर अप मार्गाच्या गाडय़ा उपलब्ध नसतील.
हार्बर मार्ग
कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३
कुठे – कुर्ला आणि मानखुर्द या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर.
परिणाम काय – पनवेल, बेलापूर आणि वाशी या स्थानकांवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे तसेच उलट मार्गावर सकाळी १०.२३ ते दुपारी ३.०१ या कालावधीतील सर्व फेऱ्या रद्द
पश्चिम रेल्वे
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
कुठे – गोरेगाव आणि बोरिवली या स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर.
परिणाम काय – सर्व जलद गाडय़ा गोरेगाव-बोरिवली या स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून