*कधी- सकाळी ११ ते दुपारी ३.३०
*कुठे- कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर
*परिणाम- कल्याण रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या जलद उपनगरी गाडय़ाची वाहतूक कल्याण ते ठाणे या स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. ठाण्यापासून या गाडय़ा पुन्हा अप जलद मार्गावर चालविण्यात येणार असून त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकांवर थांबणार आहेत.
सीएसटी येथून  सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाडय़ांना त्यांच्या नियमित थांब्यांबरोबरच घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबे देण्यात येणार आहेत.  
    रत्नागिरी-दादर (क्रमांक ५०१०४) या गाडीचा प्रवास दिवा स्थानकापर्यंतच होणार असून रविवारी ही गाडी दिवा येथूनच रत्नागिरीसाठी रवाना होणार आहे.

*कधी- सकाळी ११ ते दुपारी ३
*कुठे-कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्ग
*परिणाम-पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसटीच्या दिशेने सुटणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२३ ते दुपारी ३.०१ आणि सीएसटी येथून पनवेल, बेलापूर, वाशी येथे जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे.  या कालावधीत सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ट्रान्स हार्बर लिंक आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

*कधी- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
*कुठे- सांताक्रूझ ते गोरेगाव अप व डाऊन धीम्या मार्गावर
*परिणाम- सांताक्रूझ ते गोरेगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. १२ डब्यांच्या
सर्व गाडय़ा विलेपार्ले स्थानकात फलाट क्रमांक ३ व ४ वर दोन वेळा
थांबविण्यात येणार आहेत.