मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील उपस्थानकांवर करण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी कामांमुळे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे – अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर
कधी – डाऊन मार्गावर सकाळी १०.०८ ते दुपारी २.५४
         अप मार्गावर सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२८
परिणाम- मेगाब्लॉकमुळे सकाळी १०.०८ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ा माटुंगा स्थानकात धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काळात सर्व जलद रेल्वेगाडय़ांची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने होईल.

हार्बर रेल्वे
कुठे -पनवेल ते नेरुळ अप-डाउन  
कधी- सकाळी ११ ते दुपारी ३ परिणाम – सकाळी १०.४१ ते दुपारी ३.२७ या वेळेत सीएसटी ते पनवेल तसेच ठाणे ते पनवेल मार्गावर अप आणि डाउन दोन्ही दिशेकडील वाहतूक पनवेल ते नेउळदरम्यान बंद राहणार आहे.

पश्चिम रेल्वे
कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाउन धीमा मार्ग
कधी – रविवारी रात्री
 ११.४० ते पहाटे ४.४०
परिणाम – पश्चिम रेल्वेवर  रविवारी   रात्री पाच तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाउन दिशेच्या गाडय़ा जलद मार्गावरून धावतील. मात्र, मेगाब्लॉकमुळे अप आणि डाउन दिशेच्या काही गाडय़ा रद्दही करण्यात येतील,