*कधी : सकाळी ११ ते  दुपारी ३.३०
*कुठे : ठाणे ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर
*परिणाम :
*मुलुंड स्थानकापासून सर्व डाऊन धिम्या आणि अर्धजलद लोकल मुलुंड ते कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाडय़ा ठाणे व डोंबिवली स्थानकांवरच थांबतील.
*सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर थांबतील.
*ठाण्यापासून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी या स्थानकांवर थांबणार आहेत.
*डाऊन मार्गावर कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. या कालावधीत प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, ठाण्यापर्यंत पुन्हा मागे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.   

*कधी : सकाळी ११ ते दुपारी ३
*कुठे : कुर्ला ते वाशी
*परिणाम :
*सीएसटीहून पनवेल, वाशी, बेलापूरसाठी गाडय़ा आणि पनवेल, बेलापूर येथून सीएसटीसाठी सुटणाऱ्या गाडय़ा बंद ठेवण्यात येतील.
*या कालावधीत सीएसटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर खास लेकल गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
*सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बरमार्गे व मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

*कधी : सकाळी १० ते दुपारी ४.३०
*कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप धिम्या आणि डाऊन धिम्या मार्गावर
*परिणाम : या कालावधीत सर्व अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील. यामुळे काही अप व डाऊन लोकल रद्द केल्या आहेत.