*कुठे – कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर
*कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
*परिणाम – कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावरील गाडय़ा अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार. ठाण्यापासून त्या अप जलद मार्गावर धावतील. या गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा येथे थांबतील.
सीएसटी येथून डाऊन जलद मार्गावर सुटणाऱ्या उपनगरी गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबतील.
 रत्नागिरी-दादर (क्रमांक ५०१०४) या गाडीचा प्रवास या दिवशी दिवा स्थानकात संपविण्यात येईल.

*कुठे- सीएसटी ते कुर्ला डाऊन आणि वडाळा रोड ते वांद्रे अप-डाऊन मार्गावर
*कधी- सकाळी ११.१० ते दुपारी ३.१०
*परिणाम- सीएसटी येथून वांद्रे, अंधेरी येथे जाणाऱ्या गाडय़ा तसेच वांद्रे-अंधेरी येथून सीएसटीकडे जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक स्थगित केली आहे.
सीएसटी येथून डाऊन दिशकडे जाणाऱ्या गाडय़ा भायखळापर्यंत मुख्य मार्गावरून (डाऊन धीमी) तर भायखळा ते कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत डाऊन जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. या गाडय़ा परळ, दादर, माटुंगा, शीव या स्थानकांवर थांबतील. कुर्ला रेल्वेस्थानकापासून त्या पुन्हा हार्बर मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.
वांद्रे व अंधेरी येथील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.