News Flash

गणेशोत्सवामुळे मेगाब्लॉक रद्द

गणेशोत्सवात मुंबईकरांना लोकलचा प्रवास त्रासाचा ठरू नये यासाठी मध्य, पश्चिम व हार्बर या मार्गावरील रविवारी असणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

| August 31, 2014 04:45 am

गणेशोत्सवात मुंबईकरांना लोकलचा प्रवास त्रासाचा ठरू नये यासाठी मध्य, पश्चिम व हार्बर या मार्गावरील रविवारी असणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गणेशोत्सवात मुंबईकर आप्त-नातेवाईक, मित्रमंडळींकडे गणेशदर्शनासाठी जातात. मेगाब्लॉकवेळी गाडय़ांचे वेळापत्रक बिघडत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे रविवारी मुंबईकरांना गणेशोत्सवात प्रवास कठीण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 4:45 am

Web Title: mega bloks cancelled
Next Stories
1 विकासकाच्या कार्यालयातच घरनोंदणी करा!
2 दीड दिवसांच्या गणपतीला निरोप
3 रामगोपाल वर्मा अडचणीत
Just Now!
X