News Flash

मुंबईत आज चारही मार्गांवर मेगाब्लॉक

सीएसटी ते कुर्ला आणि सीएसटी ते वांद्रेमधील वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वे या चारही मार्गांवर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडमध्ये डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक आहे. हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी – माहीम दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसटी ते कुर्ला आणि सीएसटी ते वांद्रेमधील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. ट्रान्स हार्बर मार्गावर दुपारी १२.३५ ते २.०५ या वेळेत विशेष ब्लॉक आहे.
पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या हार्बर मार्गाच्या गोरेगावपर्यंतच्या विस्तारासाठी रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जोगेश्वरी स्थानकाजवळ डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 8:07 am

Web Title: megablock on mumabi local train route
Next Stories
1 राज ठाकरे यांचे लोकसभानिहाय मेळावे!
2 विरोधकांच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपची मुसंडी!
3 राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ
Just Now!
X